50,000 रू. कर्ज माफी ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024| Jyotiba Phule Karj Mafi Yojana

50,000 रू. कर्ज माफी ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024| Jyotiba Phule Karj Mafi Yojana

50,000 हजार रु कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले योजना 2024,महात्मा फुले 50000 कर्जमाफी, पन्नास हजार अनुदान योजना, महात्मा फुले कर्ज योजना.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत राज्यातील एकूण १५३ लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. पिक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून ५० हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ घेण्याची घोषणा च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती परंतु मध्ये उद्भवलेल्या कोविड-१९ च्या संकटामुळे ह्या योजनेसाठी अनुदान देणे शक्य झाले नाही. ते  अनुदान आता देण्याचे महाराष्ट्र सरकारने निश्चित केले आहे.

महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजना काय आहे ?

सन २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला सन २०२२ ते २०२३ या वर्षात ५० हजार रुपया पर्यंत प्रोत्साहन पर मदत देण्याचे निश्चित केले आहे. या साठी महाराष्ट्र सरकारने ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता हे जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

योजनेचे नावमहात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना
घोषणा कोणी केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
योजनेचा निधी५०,००० हजार रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाईन (Online)

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने ची वैशिष्ट्ये आणि फायदे. (Features and Benefits)

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाची माफी केली जाईल.

  • ही योजना शेतकऱ्यांसाठी पारदर्शक पद्धतीची असणार आहे.
  • ह्या योजने चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला थकबाकी भरलीच पाहिजे अशी अट दिलेली नाही.
  • ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी थेट अर्ज करण्याची किंवा भरण्याची आवश्यकता नाही.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी कर्ज मुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या खात्यात थेटपणे जमा करणार आहे.
  • राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा प्रकारच्या सर्व संस्थांना मार्फत शेतकऱ्यांनी घेतलेली पीक कर्ज माफ होणार.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने साठी पात्रता (Eligibility)

  • १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ केले जाईल.
  • शेतकऱ्याने कर्ज परतफेड न केलेली रक्कम तसेच व्याज मिळून दोन लाखापर्यंत कर्ज असल्यास शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेल.
  • कर्जाचा प्रकार हा अल्पमुदतीच्या पीक कर्ज व तो ३० सप्टेंबर २०१९ रोजी पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना मिळेल.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने साठी अपात्र (Not Eligible)

  • आजी व माजी मंत्री आणि आमदार, खासदारांना या योजने अंतर्गत लाभ मिळणार नाही.
  • केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी यांचे मासिक वेतन हे २५ हजारा पेक्षा जास्त असेल अशा वर्गाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही.(चतुर्थश्रेणी वगळून)
  • निवृत्ती वेतन हे २५ हजारा पेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • शेती उत्पन्ना व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या व्यवसायातून आयकर भरत असणाऱ्या व्यक्ती या योजनेच्या लाभ घेऊ शकणार नाही.
  • सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका अशा प्रकारच्या संस्थांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी ज्यांचे मासिक वेतन हे २५ हजारापेक्षा जास्त असेल अशा व्यक्तीला लाभ मिळणार नाही.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने साठी दस्तावेज (Documents)

आधार कार्ड

बँक खाते

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने चे अधिकृत संकेतस्थळ (official website)

संकेतस्थळ/Website :- mjpsky.maharashtra.gov.in

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने ची अर्ज प्रक्रिया (Application Process)

आपला आधार क्रमांक आपण घेतलेल्या सहकारी संस्थेच्या कर्ज खात्याशी जोडावा.

  1. मार्च २०२० पासून आधार क्रमांका सह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह बँकांनी तयार केलेल्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्ज खात्यासाठी विशिष्ट असा ओळख क्रमांक दिलेला असेल.
  2. शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेऊन जवळच्या “आपले सरकार सेवा” केंद्रात जाऊन आपल्या आधार क्रमांकाची व कर्ज रकमेची पडताळणी करून घ्यावी.
  3. पडताळणी केल्यानंतर कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार खर्च मुक्तीची रक्कम दिली असेल ती शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा होईल.
  4. कर्ज रक्कम आणि आधार क्रमांक या बाबत शेतकऱ्याचे वेगळे मत किंवा दिलेली रक्कम शेतकऱ्याला मान्य नसल्यास त्याची तक्रार समितीकडे पाठवली जाईल, समिती त्या तक्रारीची शहा-निशा करून अंतिम निर्णय देईल.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा हेल्पलाइन नंबर (Helpline Number)

ह्या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही ह्या माहितीच्या व्यतिरिक्त आणखी काही माहिती जाणून घेण्यासाठी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेला हेल्पलाइन आम्ही तुम्हाला देत आहोत त्या ठिकाणी संपर्क साधून तुम्हाला हवी असलेली माहिती प्राप्त करू शकता.

Website :- mjpsky.maharashtra.gov.in

Email ID :- contact.mjpsky2019@maharashtra.gov.in

FAQ

Q: महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत किती रक्कम दिली जाईल.

Ans :- ह्या योजनेअंतर्गत ५०,००० हजारा पर्यंत रक्कम दिली जाईल.

Q: मी मागील वर्षाचे आयकर भरले आहे मला ह्या योजनेचा लाभ मिळेल?

Ans:- नाही आयकर धारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Q: या योजनेअंतर्गत कोणत्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ मिळेल?

Ans:- या योजनेअंतर्गत केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल, ही योजना महाराष्ट्र शासनाने राबवली आहे.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *